राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गौतमी पाटील हिला सर्वाधिक वेळा बोलावलं जातं – अजितदादा नाराज

0
237

मुंबई, दि. ८ (पीसीबी) : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारीही सहभागी असतात, आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गौतमी पाटील हिला सर्वाधिक वेळा बोलावलं जातं; असं का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता त्यांनी नाराजी जाहीर केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीला यामुळे कमीपणा आणला जात आहे.

महाराष्ट्राची काही परंपरा आहेत. ते सर्वांना पाहता येईल अशाच प्रकारचे असले पाहिजेत. त्यामध्ये कोणताही अश्लील प्रकार असता कामा नये. मला काल जी माहिती मिळाली त्यानुसार, काही जिल्ह्यात बंदी आहे तर काही ठिकाणी सुरू आहे. मी याबाबत संबंधितांशी बोलणार आहे. शक्य झाल्यास अधिवेशनात हा मुद्दा मांडेल. महाराष्ट्राची परंपरा टिकली पाहिडे. कोणी चुकत असेल तर त्यांना अडवलं पाहिजे, असं ठामपणे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. तर अजित पवार यांनी लावणीबाबत मोठा निर्णय देखील घेतला असून राष्ट्रवादीकडून लावणीतील अश्लील नृत्याला बंदी घालण्यात आली आहे.