ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी गौतम चाबुकस्वार

0
336

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या पिंपरी- चिंचवड मावळ जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चाबुकस्वार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

शिवसेना दोन गटात विभागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना असे दोन गट झाले आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे बाळासाहेबांची शिवसेनेत गेले. तर, पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.

ठाकरे यांनी गौतम चाबुकस्वार यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी- चिंचवड मावळ जिल्हाप्रमुखपदी चाबुकस्वार यांची नियुक्ती नियुक्ती केली आहे. चाबुकस्वार यांनी 2014 ते 2019 दरम्यान शिवसेनेकडून पिंपरीचे विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. पिंपरी-चिंचवड शहराचे उपमहापौर म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणाची नस त्यांना माहिती आहे. कट्टर शिवसैनिकांना एकत्र करून संघटना अधिक बळकट करण्याचे चाबुकस्वार यांच्या समोर आव्हान असेल.