चायनीज फास्टफुडच्या गाडीवर टोळक्याची सशस्त्र दहशत

0
439

मोरवाडी, दि. (पीसीबी) – हातात कोयते गेऊन एक चार जणांचे टोळके पिंपरीतील एका चायनीज हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी दहशत पसरवत गल्ल्यातील पैसे चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. ५) रात्री घडली.

बालकृष्ण जीतमान श्रेष्ट (वय ३३, रा. पिंपरी) यांनी मंगळवारी (दि. ७) याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मासुळकर कॉलनी येथील हिटलर क्रॉस चायनीज या हॉटेलमध्ये फिर्यादी बालकृष्ण हे साफसफाई करत होते. यावेळी आरोपी कोयता, कुऱ्हाड, तलवार घेऊन दुचाकीवरून आले. आरोपींनी चायनीजच्या हॉटेलमध्ये येऊन बालकृष्ण आणि इतर कामगारांना शिवीगाळ करत धमकी दिली. परिसरात दहशत निर्माण करून हॉटेलच्या ड्रॉवरमधून दीड हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.