बक्षीसपत्र केलेला फ्लॅट परस्पर विकून फसवणूक

0
230

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – वेळोवेळी केलेल्या आर्थिक मदतीच्या बदल्यात बक्षीस म्हणून मिळालेला फ्लॅट परस्पर डीड ऑफ असाईनमेंट लिहून देत फसवणूक केली. हा प्रकार २८ डिसेंबर २०१७ ते १३ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत पिंपरी वाघिर येथे घडला.

बाळासाहेब प्रभाकर काटे (वय ३६, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १९) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ब्रह्मदेव बापूराव गायकवाड (वय ३७, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटे यांनी गायकवाड याला वेळोवेळी आर्थिक भरीव मदत केली होती. त्याची जाणीव ठेऊन गायकवाड याने काटे यांना पिंपरी वाघिर येथे बांधण्यात येणाऱ्या अपार्टमेंट मधील एक फ्लॅट बक्षीसपत्र करून दिला. त्यांनतर तो फ्लॅट गायकवाड याने काटे यांच्या परस्पर संतोष यशवंत कापसे यांना डीड ऑफ असाइनमेंट लिहून देत काटे यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.