वेश्या व्यवसाय प्रकरणी चौघांना अटक

0
441

वाकड, दि. १२ (पीसीबी) – वेश्या व्यवसाय प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. ९) अन्या बॉडी स्पा मसाज सेंटर, वाकड येथे करण्यात आली.

प्रतिक कोलम (वय ४८, रा. कोरेगाव पार्क, पुणे), प्रियो सोयम मिताई (वय ३०, रा. वाकड), राज टंकाबहादूर (वय २२, रा. औंध), एक महिला यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक फौजदार बंडू मारणे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपींनी आपली उपजीविका भागवली. या बाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्पा सेंटर मध्ये छापा मारून कारवाई करत चौघांना अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.