घरफोडी करून साडेचार तोळे दागिने पळवले

0
239

सांगवी, दि. २० (पीसीबी) – घरफोडी करून चोरट्यांनी साडेचार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. १९) सकाळी शितोळे नगर, जुनी सांगवी येथे उघडकीस आली.

दीपक बलराम यादव (वय ३९, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव यांच्या घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातून ८८ हजार रुपये किमतीचे ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. १८) सकाळी साडेदहा ते रविवारी (दि. १९) सकाळी साडेअकरा वाजताच्या कालावधीत घडली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.