माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

0
248

पुणे, दि. २४ (पीसीबी) – माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती श्री देवीसिंह शेखावत (वय 89) यांचे आज पुण्यात निधन झाले.

त्यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आल्याने पुण्यात केईएम हॉस्पिटलला दाखल केले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होतील.