मतदान यंत्रणाची प्रथमस्तरीय पुरवणी तपासणी सुरू

0
204

पुणे, दि. १२ : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या भोसरी येथील गोदामात ७०० बॅलेट युनिटची प्रथमस्तरीय पुरवणी तपासणी सुरू करण्यात आली.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे, तहसीलदार प्रशांत पिसाळ तसेच बेल कंपनीचे अभियंते उपस्थित होते.

कसबा विधानसभा मतदार संघात १६ आणि चिंचवड विधानसभा संघात २८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने दोन्ही मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने कोल्हापूर जिल्ह्यातील ७०० अतिरिक्त बॅलेट युनिट पोटनिवडणुकीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. या यंत्रांची आज प्रथमस्तरीय तपासणी करण्यात आली.

पुरवणी प्रथमस्तरीय तपासणी सोमवार १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे.