आधी उद्योग गेले, नंतर रोजगार गेला आता देवही जात आहेत

0
335

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : राज्याच्या आणि केंद्राच्या वेगवेगळ्या मुद्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून राज्यातून वेदांता आणि फॉक्सक्वॉन प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यामुळे विरोधकांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यातच आता आणखी एका नव्या मु्द्यामुळे सरकावर विरोधकांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सध्या देशात एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. यापैकी सहावे ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरचे आहे. मात्र आता या ज्योतिर्लिंगामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आसाम सरकारच्या एका जाहिरातीमध्ये आता भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे आसाम राज्यात असल्याचा दावा केला जात आहे. महाशिवरात्री डोळ्यासमोर ठेवून आता महाराष्ट्रात या ज्योतिर्लिंगाचा वाद पेटू लागला आहे. या मुद्यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना विचारले असता महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही शिल्लक ठेवायचे नाही असेच भाजप नेत्यांनी ठरवले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या मुद्यावर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी बोलताना सांगितले की, राज्यातून पूर्वी उद्योग गेले आणि रोजगार गेले होते, तर आता सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा हिरावून घेण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची टीका ठाकरे आणि राऊत यांनी केली आहे.
ईडी सरकारने शिंदे गटाच्या आमदारांची फौज गुवाहाटीला घेऊन गेली होती असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, एक अदृश्य शक्ती म्हणून आसाम सरकारने तिथे मदत केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आसामला भीमाशंकर ज्योतिर्लिंग दिले नसेल ना असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
आसाम सरकारने होऊ घातलेल्या महाशिवरात्रीनिमित्त जाहिरात केली होती. त्या जाहिरातीमध्ये लिहिले आहे की, सहाव्या ज्योतिर्लिंग कामरूप डाकिनी पर्वत आसाममध्ये आपले स्वागत आहे. त्यामध्ये दिलेल्या विविध ज्योतिर्लिंगांच्या यादीत भीमाशंकरच्या नावापुढे ‘डाकिनीमध्ये वसलेले भीमाशंकर’ असंही लिहिण्यात आले आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचाही फोटो असल्याचे दिसून येत आहे.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे देवस्थान आसाममध्ये नसून पुण्यात असल्याचा पुरावा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात असल्याचे अनेक पुरावे असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.