‘या’ कर्मचा-यांना बायोमेट्रिकमधून सवलत

0
262

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक थम्बमधून सवलत देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी निधन झाले. रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. 26 फेब्रुवारीला मतदान होणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी आहे.

निवडणूक कामकाजासाठी महापालिकेतील सुमारे अडीचशे पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी रुजू झालेल्या दिनाकांपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक थम्ब, फेस रिडिंग इम्प्रेशन प्रणालीमधून सवलत देण्यात आली आहे.

तसेच निवडणुक कामकाजातून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांना बायोमेट्रिक थम्ब, फेस रिडिंग इम्प्रेशन प्रणाली बंधनकारक असणार आहे.