EVM मशीन घोटाळा, खरे काय ?

0
42

मुंबई, दि. 27 (पीसीबी) : सध्या देशांमध्ये ईव्हीएम मशीन विषयी बरेच तर्क वितर्क सुरू आहेत. व सामान्य लोक संभ्रमात आहेत. मी निवडणुकीमध्ये 12 वेळा Preciding Officer म्हणून काम केले. मतदानाच्या वेळी सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान सर्व पक्षांच्या प्रतिनिधी समोर Mock poll घेतल्या जाते. व 50 मतदान घेऊन आपले प्रत्येकाचे मत त्याच उमेदवाराला जाते की, नाही. हे तपासल्या जाते. रिझल्ट बरोबर आला की, नाही. हे प्रतिनिधींना दाखवल्या जाते. नंतर मशीन मधील संपूर्ण डाटा डिलीट करून बटनांना सील करून त्यावर सर्व प्रतिनिधींच्या सहा घेण्यात येतात. सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत मतदान सुरू असताना सर्व कारवाई सर्व पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत होते.

तसेच झोनल ऑफिसरसह सर्व अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी भेटी होतात व त्यांना अहवाल सादर करावा लागतो.सहा वाजता मतदान बंद करताना रजिस्टर वरील मतदान नोंदणी व ईव्हीएम मशीन वरील नोंदणी अंक यांचा ताळ मेळ प्रतिनिधी समोर तपासल्या जातो. व टॅग लावून रिझल्ट बटन ला सील करण्यात येते. नंतर उरलेल्या बटनांना झाकण बंद करून सील केल्या जाते. तसेच मशीनची बॅटरी काढून त्या जागेला व बॅटरीला वेगवेगळे सील केले जाते. व मशीनला Tag seal सुद्धा बसवण्यात येते. या सर्व ठिकाणी प्रतिनिधींच्या सह्या घेण्यात येतात. त्यानंतर मशीनला पेपर सील बसवण्यात येते. तसेच मशीन पेटीमध्ये ठेवून पेटीला सुद्धा सील लावण्यात येते. यावर सुद्धा प्रतिनिधींच्या सह्या घेण्यात येतात. यानंतर सर्व साहित्य व मशीन मतदान टीम मार्फत त्यांच्या जबाबदारी मध्ये योग्य ठिकाणी तहसील येथे पाठवण्यात येते. तेथे मशीनच्या सील ची व इतर साहित्याची तपासणी होऊन मशीन व साहित्य स्वीकारल्या जाते………. नंतर मतमोजणीच्या दिवशी सर्व पक्षांच्या प्रतिनिधी समोर मशीनचे एक एक सील काढल्या जाते. त्या अगोदर प्रतिनिधींना मशीन सील बंद असल्याचे दाखवण्यात येते. नंतर बॅटरी व बॅटरी बसवण्याची जागा यावरील सील काढून तीच बॅटरी मशीनमध्ये बसवण्यात येते. व रिझल्ट बटन वरील सील काढून रिझल्ट बटन दाबून प्रतिनिधींना प्रत्येक उमेदवाराच्या मतदानाचे अंक दाखवण्यात येतात. व निकालाची नोंद रजिस्टरवर घेऊन त्यावर प्रतिनिधींच्या सह्या घेण्यात येतात. हीच प्रक्रिया सर्व इतर मशीन बाबत घडते.

प्रक्रियेवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तहसीलदार, एसडीओ, झोनल ऑफिसर, पोलीस ऑफीसर. इतर अनेक ऑफिसर व प्रतिनिधी असे जवळपास 50 जणांची एका मशीनवर काटेकोर नजर असते. म्हणजेच एका मशीन मध्ये हेराफेरी करण्यासाठी या 50 जणांना मॅनेज करूनही हेराफेरी करणे शक्य नाही….. कारण 1) मशीनचा इंटरनेट सोबत कोणताच कॉन्टॅक्ट नसल्यामुळे तिला हॅक करता येत नाही. 2) तसेच बॅटरी काढून घेतल्यामुळे इलेक्ट्रिक करंटच नसल्यामुळे मॅन्युअली कोणताच बदल करता येत नाही. 3) तसेच हे सर्व करूनही मतदानाची पूर्ण प्रक्रिया केल्याशिवाय त्यामध्ये मताची नोंद करता येत नाही. म्हणजेच थोडक्यात ईव्हीएम मशीन मध्ये हेराफेरी अशक्य आहे….. भारतातील ईव्हीएम मशीन (HILL) हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड व (BHEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन कंपन्यांनी बनवली आहे. व ही मशीन जगातील इतर 14 देशांमध्ये निर्यात होते. व याच मशीनच्या साह्याने त्या सर्व देशांमध्ये मतदान होते. मात्र अमेरिका व इतर काही देशांनी स्वतः बनवलेल्या मशीन मध्ये काही फॉल्ट आढळले. म्हणून त्या देशांनी मशीन वरील मतदान बंद करून बॅलेट पेपरने मतदान घेऊन, भारतीय मशीनची मागणी केलेली आहे. इतकी भारतीय ईव्हीएम मशीनची विश्वासार्हता असताना व भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची असताना मतदान मशीन ने न घेता बॅलेट पेपर ने घेणे खूप खर्चिक व वेळ खाऊ असल्यामुळे विज्ञान युगातून अश्मयुगात परत जाण्यासारखे आहे….. सन 2009 मध्ये मशीनवर शंका घेत सुब्रमण्यम स्वामी व लालकृष्ण अडवाणी यांनी सुप्रीम कोर्टात तक्रार केस दाखल केली होती. त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने 2014 मध्ये दिला.

कोर्टाने ईव्हीएम मशीन बाबत कोणतीही शंका व्यक्त केली नाही. मात्र मतदाराच्या समाधानासाठी आपले मतदान त्याच उमेदवाराला जाते की नाही. हे मतदाराला समजले पाहिजे. असा निकाल दिला. त्यामुळे मशीनला 2015 मध्ये V V PAD जोडण्यात आले. त्यामध्ये काचातून चिठ्ठीवर छापलेला मजकूर वरून मतदान कोणत्या उमेदवाराला गेले ते दिसते. व ती चिठ्ठी व्हीव्हीपॅट मध्ये जमा होते. यादृच्छिक पद्धतीने एकूण मतदानाच्या दहा टक्के अशा चिठ्ठ्यांची मोजणी होते. सुप्रीम कोर्टाच्या एका निकालामुळे कोट्यावधी व्हीव्हीपॅट निर्माण करण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च आला. तसेच 2018 मध्ये निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना व सॉफ्टवेअर तज्ञांना, ही मशीन हॅक करून दाखवणे किंवा हेराफेरी करून दाखवण्याचे आव्हान दिले. ते आजपर्यंत कोणीही स्वीकारले नाही. याउलट बॅलेट पेपरने मतदानामध्ये पेटी हस्तगत करून त्यामध्ये पाहिजे त्या उमेदवाराच्या नावाने मतपत्रिका कोंबून हेराफेरी ची खूप उदाहरणे आहेत. म्हणजेच ईव्हीएम मशीन बाबत कोणत्याही पक्षाची ओरड ही निव्वळ कोल्हेकुई असून देशाचा वेळ व पैसा बरबाद करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे षडयंत्र होय.