दिल्ली (पीसीबी) । दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयावर आयकर विभागाने आज धाड मारली आहे. दिल्लीतील केजी रोडवरील असलेल्या बीबीसीच्या भारतीय कार्यालयात हा छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यादरम्यान बीबीसी कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे फोन व आयडी आयकर विभागाकडून जप्त करून घेण्यात आले आहेत.
दिल्लीतील बीबीसी कार्यालयातील ५० हुन अधिक अधिकारी आणि कर्मचारी या छाप्यात सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच दिल्लीतील हे कार्यालय आयकर विभागाकडून सील करण्यात आले आहे. यासोबतच मुंबईतील कार्यालयावरही आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. मात्र, या छाप्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीबीसी या वृत संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरील वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित केला होता. त्यानंतर आता ही छापेमारी झाली आहे.














































