DMEJ’ संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी विकास शिंदे यांची निवड !

0
218

पिंपरी ,दि. २९ (पीसीबी) – डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी ‘लोकशक्ती’चे संपादक विकास शिंदे तर सचिवपदी ‘महाराष्ट्र चौफेर’चे संपादक मंगेश सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी निवडीची घोषणा करुन त्यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश कुगावकर, शामल खैरनार, केतन महामुनी, अतुल दिक्षित, अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच डिजिटल मिडियाच्या संपादक पत्रकार संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अजिंक्य स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहर डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये शहराध्यक्षपदी ‘लोकशक्ती चे विकास शिंदे, उपाध्यक्षपदी ‘रोखठोक चे गणेश हुंबे, सचिवपदी ‘महाराष्ट्र चौफेर’चे मंगेश सोनटक्के, कोषाध्यक्षपदी ‘लोकमान्य टाईम्स’चे संजय शिंदे, खजिनदारपदी ‘महाराष्ट्र ब्रेकींग’च्या लिना माने, कार्यकारिणी सदस्य ‘एकसत्ता’चे बापू जगदाळे, ‘NEWS15 मराठी’चे गणेश मोरे, ‘लोकमराठी’चे रविंद्र जगदाळे, वर्षा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.