अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघातर्फे ‘दिल की नजर सें नजरों के दिल से’ या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा स्वर संध्या कार्यक्रमाचे आयोजन

0
419

चिंचवड, दि.९ (पीसीबी) – अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघातर्फे स्वरतरंग संगीत प्रेमी मंच कोल्हापूर निर्मित ‘दिल की नजर सें नजरों के दिल से’ या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा स्वर संध्या कार्यक्रमाचे शनिवार दि.११ फेब्रुवारी २३ रोजी सायंकाळी ५ वाजता प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे आयोजन करण्यात आले आहे. वरील कार्यक्रम सामाजिक बांधीलकी म्हणून आयोजित करण्यात आला असुन या कार्यक्रमातुन मीळणारा निधी हा पिंपरी चिंचवड एरीयातील वृद्ध, निराधार व बालकांच्या साठी चांगले कार्य करत असलेल्या संस्थांना मदत रुपात देण्यात येणार आहे.

अशी माहिती गुजराती समाज महासंघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र शाह यांनी दीली. स्वरतरंग संगीत प्रेमी मंच ही संस्था कोल्हापूर येथील आपआपल्या व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांनी स्थापन केलेली असुन आज पर्यंत त्यांनी हाऊसफुल्ल असे ५६ कार्यक्रम महाराष्ट्रात सादर केले आहेत पिंपरी चिंचवड येथील रसिकांनी वरील कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघ पिसीएमसी एरीया राज्य कार्यकारी समीती सदस्य ग्रुप व पिसीएमसी महिला शाखा समीती या संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे वरील कार्यक्रमाच्या प्रवेशीका साठी कृपया संयोजकांशी संपर्क साधावा असे आवहन केले आहे.