पिंपरी (दिनांक : २७ फेब्रुवारी २०२३) विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने भोसरी येथे सोमवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी धर्म रक्षानिधी संकलन अभियान विधी विभाग यांचे वतीने राबविण्यात आले. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रांत सहमंत्री ॲड. सतीश गोरडे, प्रांतविधी सहप्रमुख ॲड. सोहम यादव, ॲड. मंगेश नढे, ॲड. कृष्णा वाघमारे, ॲड. अनिल शिंदे, ॲड. ऋतुराज आल्हाट, ॲड. अक्षय भालेराव, ॲड. नीलेश कामठे, ॲड. सूर्यकांत लबडे, ॲड. सूरज खांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ॲड. सतीश गोरडे यांनी समाजातील उपस्थित मान्यवरांशी संवाद साधताना, “संपूर्ण जगातील हिंदूंच्या अभ्युदयासाठी २९ ऑगस्ट १९६४ रोजी विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली. जगातील सर्व हिंदूंमधील सर्व प्रकारचे भेदभाव दूर ऐक्य निर्माण करणे, प्राचीन परंपरा- संस्कृती-धर्मनिष्ठा जागृत करणे, आध्यात्मिक मूल्यांचे संरक्षण अन् संवर्धन करणे, समस्त हिंदूसमाजात समरसतेचा भाव निर्माण करणे, हिंदुत्वाचा कल्याणकारी सिद्धान्त अन् व्यवहार यांची सांगड घालणे, परधर्मात गेलेल्या व्यक्तींंना हिंदू धर्मात सन्मानाने परत आणणे या प्रमुख उद्दिष्टांसाठी विश्व हिंदू परिषद कार्यरत आहे. तीन वर्षांतून एकदा हितचिंतक अभियान राबविण्यात येते. त्या माध्यमातून या वर्षी सुमारे ६९.५१ लाख व्यक्ती विश्व हिंदू परिषदेचे हितचिंतक देशभरात जोडले गेलेले आहेत. यामध्ये १.३३ लाख ग्रामीण भागातील असून १९.२१ लाख युवा हितचिंतक जोडले गेले आहेत. विश्व हिंदू परिषदेचे देशपातळीवर १३ क्षेत्र, ४४ प्रांत आणि ३०५ विभाग आहेत. त्यामध्ये १०७८ जिल्हा, ९६९८ प्रखंड, ७१८९ प्रखंड समिती तसेच एकूण ६९१२९ समित्या, २१९१३ सत्संग आणि ५३८ व्यक्ती या पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून समर्पित भावनेने काम करीत आहेत. या वर्षी विश्व हिंदू परिषदेने २५४०२ स्थापनादिन कार्यक्रम, ६१९२ दुर्गाष्टमी कार्यक्रम, ४१३६ गोपाष्टमी कार्यक्रम आणि १७८२ शौर्यदिन कार्यक्रमाचे यशस्वी देशभरात आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे परिषदेने १३१९ बलोपासना केंद्र, मिलन दुर्गावाहिनी अधिक मातृवाहिनी ६००८, ८२७ बालसंस्कार केंद्र, कुल सेवाकार्य ३०० अधिक ७७६० जिल्हा केंद्र, ८४९ संस्कारशाळा, ३९९८ स्वावलंबन केंद्र कार्यरत असून आजपर्यंत सुमारे १५१७६४ गोवंश वाचविण्यात यश मिळाले आहे. तसेच परिषदेने १४ प्रांतातील २३१९० प्रकरणांत परावर्तन आणि ४५२० कन्यारक्षण आणि १७४८० धर्मांतराच्या प्रकरणांत यश प्राप्त केले आहे. परिषदेच्या माध्यमातून २६८१४ शेतकऱ्यांना कृषिप्रशिक्षण देण्यात आले आहे. ९१४ मासिक प्रखंड वर्गाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी समर्पित भावनेने कार्यरत आहेत!” अशी विस्तृत माहिती दिली.
प्रास्ताविक ॲड. सोहम यादव, सूत्रसंचालन संकेत राव आणि आभार प्रदर्शन ऋतुराज ॲड. आल्हाट यांनी केले.
– प्रदीप गांधलीकर
७४९८१८९६८२
९४२१३०८२०१