Delhi MCD Election: आप’च्या “या” तृतीयपंथी उमेदवाराचा जोरदार विजय…!

0
392

नवी दिल्ली,दि.०७(पीसीबी) – सुलतानपूर माजरा हा विधानसभेत उपस्थित असलेल्या तीन प्रमुख वॉर्ड क्रमांक- 42 सुलतानपुरी- ए प्रभागांपैकी एक आहे. येथून आम आदमी पक्षाचे उमेदवार बॉबी किन्नर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या एकता जाटव यांचा पराभव केला. आम आदमी पार्टीने बॉबी किन्नरला येथे उमेदवारी दिली होती आणि माजी नगरसेवक संजय यांचे तिकीट नाकारले होते.

ही जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, न्यायालयाने महिलांसाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्याचा अधिकार षंढ समाजातील लोकांना दिला आहे. त्यामुळेच आप पक्षाने ही सुवर्णसंधी हातातून जाऊ दिली नाही. सुलतानपुरी-ए प्रभागातून बॉबी किन्नर यांना संधी देऊन आप पक्षाने ही लढत अटीतटीची ठरवली.

विधानसभ- सुलतानपूर माजरा
प्रभाग – सुलतानपुरी-अ
प्रभाग क्रमांक- 43
भाजप- एकता जाटव
आप – बॉबी किन्नर (विजय)
काँग्रेस – वरुण ढाका

याठिकाणी अस्वच्छता, वीजपुरवठा खंडित होणे, पाणीपुरवठा खंडित होणे यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची प्रदीर्घ काळापासून समस्या असून, या प्रभागातील नाल्यांची सफाईची सुद्धा मोठी समस्या आहे. 2017 च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे संजीव कुमार यांनी येथूनच विजयाची चव चाखली आणि काँग्रेस आणि भाजपला जमिनीवर आणले. दरम्यान यावेळी आम आदमी पार्टी भाजपला टक्कर देत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. भाजपला सहज जिंकणे अवघड आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाबाबत लोक म्हणतात की काँग्रेस स्पर्धेबाहेर आहे.