कंटेनरची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

0
290

चाकण, दि. २० (पीसीबी) – चाकण-शिक्रापूर रोडने जाणाऱ्या दुचाकीला एका कंटेनरने पाठीमागून धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. १८) सकाळी अकरा वाजता साबळेवाडी येथे घडला.

सुभाष दत्तात्रय साळुंके (वय ५४, रा. बहुळ, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दशरथ रामभाऊ वाडेकर (वय ५८, रा. बहुळ, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एमएच १५/सीके २८५०) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाडेकर आणि त्यांचा मित्र सुभाष साळुंके हे दुचाकीवरून चाकण-शिक्रापूर रोडने जात होते. साबळेवाडी गावाजवळ आल्यानंतर वाडेकर यांच्या दुचाकीला पाठीमागून एका कंटेनरने धडक दिली. त्यात सुभाष साळुंके यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.