काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे भाजपमध्ये; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

0
245

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सचिव सचिन साठे यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. साठे यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे.

सचिन साठे हे 1997 पासून अर्थात विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षाचे काम करत होते.  एनएसयूआयचा जिल्हाध्यक्ष, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदावर काम केले. 2014 ते 2020 या साडे सहा वर्षांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषवले. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचा निरीक्षक म्हणून काम केले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी प्रदेश सचिवपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.