एक वर्षासाठी चेतन बेंद्रे आपमधून निलंबित

0
222

आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांना 1 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

चिंचवड दि. १५ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपने मनोहर पाटील यांना उमेदवारी दिली होती. परंतु, उमेदवारी अर्ज आणि पक्षाचा ‘बी’ फॉर्म अपूर्ण असल्याने पाटील यांचा अर्ज बाद झाला. पाटील यांना एबी फॉर्म कोरा देण्यात आला. तसेच 10 अनुमोदकांच्या सह्या न घेता फॉर्म भरण्यात आला. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला. त्यामुळे चेतन बेंद्रे यांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

तसेच राज्याचे सचिव धनजंय शिंदे यांची एबी फॉर्म देण्याची जबाबदारी असताना व स्वत: हजर असताना हा प्रकार घडल्यामुळे आप पक्षाची महाराष्ट्रामध्ये नाहक बदनामी झाली. यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली. स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबत विचारणा केली असता चेतन बेंद्रे यांनी धनंजय शिंदे यांच्या समक्ष बिराजदार या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.