तीन तलाक प्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा

0
363

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पत्नीचा छळ करून तिच्या नकळत पतीने दुसरे लग्न केले. पत्नीच्या माहेरचे लोक त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता पतीने तीन वेळा तलाक बोलून पत्नीला घरातून हाकलून दिले. हा प्रकार १५ फेब्रुवारी २०२१ ते ४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत हजरत टिपू सुलतान झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी पीडित विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३९ वर्षीय पती, त्याचा भाऊ, वडील आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या माहेरच्या लोकांविषयी वाईट बोलून लग्नात काही घेऊन न आल्यामुळे त्यांना माहेरहून चारचाकी गाडी, सोन्याचे दागिने घेऊन येण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला. पतीने फिर्यादीच्या नकळत दुसरे लग्न केले. फिर्यादी यांच्या माहेरच्या लोकांनी दुसऱ्या लग्नाबाबत विचारणा केली असता पतीने फिर्यादीस तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट दिला व फिर्यादीस घरातून बाहेर हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.