हिंदुत्वाला लाथ मारून काँग्रेस व राष्ट्रवादीचा विचार स्वीकारीत भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून युती तोडली

0
231

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – भाजप-सेना युती बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस या सर्वांनी टिकवली. पण, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला लाथ मारून काँग्रेस व राष्ट्रवादीचा विचार स्वीकारीत भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून युती तोडली. उद्धव ठाकरे यांचा स्वार्थ आणि पूत्रप्रेम हेच युती तोडण्यास जबाबदार आहे.

युती तोडली नसली तर बरे झाले असते असे आता उद्धव ठाकरे यांना वाटते. त्यांना त्यांची चूक लक्षात आली आहे. पण आता चूक सांगता येत नाही. सावरकर यांचा अपमान होत असताना सरकार जाईल म्हणून तोंडाला पट्टी बांधली. आता हिंदुत्ववावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही, असे बावनकुळे यांनी ठणकावले. निवडणुका या लागणारच आहे. 2024 च्या लोकसभा विधानसभा निवडणुका होणारच आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर इतर निवडणुका लागणार आहे. आम्ही निवडणुकांना घाबरत नाही. निवडणुका लागतील त्यावेळी मोदींच्या नेतृत्वात निवडणुका लढवू. उद्धव ठाकरे यांच्या गरळ ओकण्याला जनता धडा शिकवेल. केव्हाही निवडणुका होऊ द्या आम्ही तयार आहो असे ते बावनकुळे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या जवळचे 50 आमदार निघून गेले. त्यांना अल्पमतातील सरकार टिकवण्यासाठी राज्यपालांची साथ हवी होती. राज्यपालांनी संवैधानिक पद्धतीने सरकार स्थापन केले. ठाकरे सरकारच्या नियमबाह्य कामांना चाप लावण्याचे काम राज्यपालांनी केले. म्हणून ते डोळ्यात खूपत होते. अनेक अटी व शर्ती घालून अनिल देशमुख यांना फक्त जामीन मिळाला आहे. त्यांना क्लिनचीट मिळालेली नाही. न्यायालयात अजूनही खटला सुरू आहे. अनिल देशमुख यांनी जल्लोष करीत शक्तिप्रदर्शन केले. पण जनतेच्या न्यायालयात तसेच न्यायालयातही ते आरोपी आहे. जल्लोष करून त्यांनी खूप काही मिळवले असे नाही.

नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडले नसते तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले असते असे शिवसेना व काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. तर नाना पटोले मात्र राज्यपालांवर आरोप करीत आहेत. पटोले यांनी पहिले राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या नेत्याला खरे काय ते विचारावे असे बावनकुळे म्हणाले. बोहरा समाजाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लहानपणापासून प्रेम आहे. गुजरात प्रवासामध्ये बोहरा समाजासोबत त्यांनी वेळ घालवला आहे. मुस्लिमांना भेटल्यामुळे हिंदुत्व जात नाही. तर हिंदुत्वावर आक्रमण झाल्यावर चूप राहिले तेव्हा हिंदुत्व जाते. मुस्लिम समाजाला सोबत ठेवण्यात आक्षेप नाही. काहीही बोलायला न राहिल्याने सकाळपासून भोंगा सुरू होतो.