भाजपच्या शंकर जगताप यांचाही उमेदवारी अर्ज दाखल

0
363

थेरगाव, दि. ६ (पीसीबी) – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शंकर जगताप बंडखोरी करणार का याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आज (सोमवारी) जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पाटील, सरचिटणीस अनुप मोरे उपस्थित होते.

त्याचवेळी उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख, माजी नगरसेवक शंकर जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, डमी अर्ज भरावा लागतो. शंकर जगताप यांचा डमी अर्ज आहे. आमच्या उमेदवार अश्विनी जगताप याच आहेत. ‘इथे बदल नाही’.