लोकोपयोगी कामे भाजप आणि शिवसेना पक्षाने केली

0
323

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – तीनशे चौरस फुटाचे घर सरकारी योजनेतून मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ अभियानामुळे घरापासून ते गावकुसापर्यंत शौचालये उभारली गेली. महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट रद्द केला. आमच्या सरकारने एसटीमध्ये ७५ वर्षांपुढील ज्येष्ठांना मोफत प्रवासाचा निर्णय घेतला. ठाकरे सरकारने बंद केलेली मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य योजना सुधारित केली. या योजनेतून गरजू रुग्णांपर्यंत १०० कोटींहून अधिक रक्कम पोहोचली आहे. अशी अनेक लोकोपयोगी कामे भाजप आणि शिवसेना पक्षाने केली आहेत. त्यामुळे मतदार कामे करणाऱ्या सरकारच्या बाजूने उभे राहणार आहेत.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनीही चिंचवड मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेवून मतदारसंघाचा कायापालट केला आहे. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचेही योगदान आहे. या विकासकामांमुळेच येथील नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय बदल झालेला आहे. येथील जनता विकासकामाला प्राधान्य देणारी आहे. जनतेला लक्ष्मण जगताप यांनी केलेला विकास दिसतो आहे. त्यामुळेच ही जनता लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करणार याची मला पूर्ण खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.