भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
361

तळेगाव, दि. १२ (पीसीबी) – दुचाकीवरून कामावर निघालेल्या व्यक्तीचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. १०) सकाळी साडेआठ वाजता तळेगाव-चाकण रोडवर सुदवडी येथे घडला.

संतोष दादाराव सुरवाडे (वय ३३) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष यांचा
मित्र रवीकिरण रामाकृष्णा पोटू (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामनारायण रतन यादव (रा. कल्याण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सुरवाडे हे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडने कंपनीत कामावर जात होते. ते सुदवडी गावच्या हद्दीत आले असता त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टँकर चालकाने दुचाकीला धडक दिली. त्यात संतोष हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.