उसने दिलेले पैसे मागितल्याने मारहाण

0
292

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – हात उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून एकास मारहाण करून डोक्यात दारूची बाटली फोडली. ही घटना गुरुवारी (दि. ९) रात्री भोसरी येथे घडली.

मोहनसिंग पहाडसिंग ठाकूर (वय ३४, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खेमसिंग ठाकूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहनसिंग हे व्यावसायिक आहेत. त्यांनी खेमसिंग याला हात उसने पैसे दिले आहेत. ते पैसे त्यांनी परत मागितले असता त्याचा खेमसिंग याला राग आला. त्या रागातून त्याने मोहनसिंग यांना शिवीगाळ करून काचेची दारूची बाटली मोहनसिंग यांच्या डोक्यात फोडली. त्यात मोहनसिंग हे गंभीर जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.