पत्नीच्या आतेभावाला मारहाण

0
378

चिखली, दि.१४ (पीसीबी) | घरगुती कारणावरून एका व्यक्तीने पत्नीच्या आते भावाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १२) रात्री नऊ वाजता पवार वस्ती, चिखली येथे घडली.

मोहम्मद अनस चौधरी (वय २०, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरशद अकबरअली खान (वय ३०, रा. पूर्णानगर, चिंचवड) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी हे त्यांच्या जाते बहिणीची कपड्याची पिशवी देण्यासाठी तिच्या घरी जात असताना आते बहिणीचा पती खान याने त्यांना अडवले. त्याच्या गोडाऊन मध्ये नेऊन घरगुती कारणावरून त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व लाकडी बांबूने मारहाण केली. आरोपी महिलेने फिर्यादींना त्याच्या मेहुण्याला बोलावून घेण्यास सांगितले. त्याला बोलावून घेण्यास फिर्यादींनी नकार दिला असता आरोपींनी फिर्यादीस मारहाण करत सोडणार नसल्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.