मुलाला ओरडल्याच्या रागातून भावजईला मारहाण

0
705

पिंपरी, दि.८ (पीसीबी) – मुलाला ओरडल्याच्या रागातून दिराने आणि त्याच्या पत्नीने भावजईला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. ५) रात्री नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

विकी महेश वाल्मिकी, त्याची पत्नी (दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दिराच्या दहा वर्षीय मुलाने घरासमोर कागद कचरा केला. त्यामुळे फिर्यादी पुतण्याला ओरडल्या. त्या कारणावरून विकी आणि त्यांच्या पत्नीने फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादी यांच्या मुलीच्या हातावर मारून तिलाही जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.