भीमाशंकर ज्योर्तीलिंगावर आसाम सरकारने केलेल्या दाव्याचा निषेध : अँड. तापकीर

0
328

आळंदी दि. १५ (पीसीबी) – देशातील व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने दावा केल्याने लाखो भाविकांच्या भावना दुखावल्याने आसाम सरकारचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांनी तीव्र निषेध केला आहे.
महाशिवरात्री निमित्त आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांचे छायाचित्र देत गुवाहाटी जवळील डाकिनी जंगल टेकड्यांचे परिसरातील भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग असल्याचे म्हंटले आहे. हि हश्यास्पद बाब असून भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. त्या बाबत बारा ज्योतीर्लिंगाबाबतचा इतिहास आणि धार्मिक मान्यता अनादी काळापासून च्या आहेत. असे असताना देखील सहावे ज्योतिर्लिंग आसाम मध्ये असल्याचे आसाम चे मुख्यमंत्री यांच्या दाव्यावर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आपली भूमिका तात्काळ स्पष्ठ करुन आसाम मधील भाजपच्या सरकारचा निषेध करून खरी वस्तू स्थिती आसाम सरकारला स्पष्ठ करावी. आसाम सरकारने एका इंग्रजी दैनिकात जाहिरात देऊन महाराष्ट्रातील वारकरी भाविक व जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. असे असताना सुद्धा राज्यातील सरकार मूग गिळून बसले असून अद्यापही या बाबतची भूमिका सरकारने स्पष्ठ केली नाही. या मूळे सरकार बद्दल जनतेच्या मनात नाराजी असून त्या बाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. आसाम सरकारने महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगा बाबत केलेला दावा चुकीचा व खोटा असून तो तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा राज्यातील तमाम शिवभक्त, वारकरी व भाविकांना आसाम सरकार विरुद्ध राज्यात तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांनी दिला आहे.