कुटुंबातील महिलांबाबत अपशब्द वापरल्याने दोन मित्रांमध्ये वाद

0
293

चिंचवड, दि.१४(पीसीबी) | दोन मित्र गप्पा मारत बसले असता कुटुंबातील महिलांबाबत अपशब्द वापरल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यात एकाने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १२) सायंकाळी कृष्णानगर, चिंचवड येथे घडली.

विकास मनोहर जावळे (रा. स्पाईनरोड, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गणेश उर्फ अप्पा दादू खिलारे (वय ४०) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. गणेश यांच्या पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि विकास हे मित्र आहेत. ते रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कृष्णानगर येथील पाण्याच्या टाकीजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी विकास याने गणेश यांच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले. त्यावरून गणेश यांनी देखील विकास याच्या आई आणि बहिणीबाबत अपशब्द वापरले. त्या रागातून विकासने गणेश यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. जवळच पडलेला दगड गणेश यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.