आदित्य ठाकरे सोमवारी चिंचवडला

0
313

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे सक्रिय सहभाग घेत आहेत. सोमवारी कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आदित्य ठाकरे यांचा रोड शो महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील महाविकास आघाडीची नियोजन बैठक सुरू झाली आहे.

आदित्य ठाकरे यांचा रोड शो कोणत्या मार्गाने होईल, हे या बैठकीत निश्चित केले जाणार आहे. कसबा चिंचवड पोटनिवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. भाजपाकडून केंद्रीय मंत्री, भाजपचे चाणक्य अमित शहा येत्या आठवड्यात पुणे दौरा करणार आहेत. महाविकास आघडीकडूनही स्टार प्रचारक निवडणुकीत उतरणार आहेत. त्यातच आता आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे.

पहिल्या टप्प्यात सकाळी चिंचवड नंतर पुण्यात सायंकाळी चार वाजता आदित्य कसब्यात रोड शो करणार आहेत. सकाळी शुभम गार्डन शेजारी येत आहेत. सकाळी १० वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा सुरु होईल, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले यांंनी सांगितले.

अजितदादा पवार व नाना पटोले येत आहेत.