जबरदस्तीने घरात घुसून महिलेशी गैरवर्तन

0
452

आळंदी, दि. १२ (पीसीबी) – महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिघांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेस मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्री आळंदी येथे घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जगदिश काकडे व दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती शुक्रवारी रात्री घरात नव्हते. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास जगदीश काकडे आणि अन्य दोन अनोळखी इसम फिर्यादी घरासमोर आले. त्यांनी घराचा दरवाजा वाजवून फिर्यादी यांचे पती आल्याचे भासवले. त्यामुळे फिर्यादींनी दरवाजा उघडला असता तिघेजण जबरदस्तीने घरात आले. फिर्यादीचे तोंड दाबून त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादींनी आरडाओरडा केला असता तिघांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.