शेतात झोपला म्हणून डोक्यात टाकला दगड

0
338

चाकण, दि. ४ (पीसीबी) – शेतात काम करताना मजूर शेतात झोपला. त्या कारणावरून मालकाने मजुराच्या डोक्यात दगड घालून त्याला बेशुद्ध केले. ही घटना गुरुवारी (दि. २) पहाटे साडेचार वाजता संतोष नगर, भाम येथे घडली.

बाळासाहेब मधुकर सोनवणे असे जखमी मजुराचे नाव आहे. याप्रकरणी अनिल महादेव सोनवणे (वय ४५, रा. संतोषनगर, भाम, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल विठ्ठल कुंभार (वय २६, रा. संतोषनगर, भाम, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ बाळासाहेब सोनवणे हा शेतात काम करत असताना पहाटेच्या वेळी त्यांना झोप लागली. त्यामुळे ते शेतात झोपले. त्यावरून आरोपीने तू काम का करीत नाही. झोपतो का, असे म्हणत झोपलेल्या अवस्थेतच डोक्यात दगड घातला. यात बाळासाहेब हे गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.