अर्थसंकल्पाआधीच शेअर बाजारात जोरदार घसरण, सेन्सेक्स इतक्या अंकांनी कोसळला

0
195

मुंबई, दि.२७ (पिसिबी) : देशाचं बजेट सादर व्हायला जेमतेम चार दिवस उरलेले असताना आज शेअर बाजारातजोरदार पडझड बघायला मिळतेय. प्रमुख्यानं अदाणी समूह आणि बँकिंग क्षेत्रातल्या शेअर्समध्ये झालेल्या तूफान विक्रीमुळे आज राष्ट्रीय आणि मुंबई या दोन्ही शेअर बाजारांचे निर्देशांक कोसळले. निफ्टी साडे तीनशे तर सेन्सेक्स 1 हजार पेक्षा अधिक अंकांनी गडगडले. गेल्या दोन सत्रात मिळून निफ्टीत साडे चारशे पेक्षा जास्त अंकांची पडझ़ड नोंदवण्यात आलीय.

सेन्सेक्समध्येही पडझड
तिकडे सेन्सेक्समध्येही गेल्या दोन सत्रात 1500 पेक्षा अधिक अंकांची पडझड झालीय. गुंतवणूकदारांचं लाखो कोटींचं नुकसान झालंय. गेल्या चार वर्षात वारेमाप नफा कमावून देणारे अदाणी समूहाचे शेअर्स गेल्या दोन सत्रात जोरदार आपटले आहेत. उद्योगपती गौतम अदाणींच्या एकूण संपत्तीवरही या पडझडीचा खूप मोठा परिणाम झाला आहे.

हिंडनबर्ग शॉर्ट सेल रिसर्च या कंपनींन अदाणी समूहाच्या एकूणच व्यवहारांमध्ये गोलमाल असल्याचा रिपोर्ट सार्वजनिक केलाय. तेव्हापासून अदाणीं समूहाचे शेअर तर कोसळले आहेत. त्याच्यासोबतच समूहाला मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं आहे त्या बँकांचे शेअर्सही कोसळले आहेत.

हिंडनबर्गचा अहवाल
Hindenburg रिसर्चने जाहीर केलेल्या अहवालात अदानी ग्रुपने शेअर मार्केटमधील आकडेवारीमध्ये जाणीवपूर्वक फेरफार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे एका दिवसात अदानी समूहाचं तब्बल 489,99,30,00,000 कोटींचं नुकसान झालं आहे. हा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अदानी ग्रुपचे शेअर धडाधड कोसळले आहे. अदानी ग्रुपच्या कोट्यावधींच्या शेअर्सचा चुराडा झाला आहे.

अदानी ग्रुपने शेअर मार्केटमध्ये बोगस पद्धतीन कंपनीची उलाढाल दाखवण्यासाठी संबधीत कंपन्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अदानी ग्रुपवर मनी लाँड्रिंग, कर डॉलर्सची चोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले आहेत. या रिपोर्टनंतर एकच खळबळ उडाली. हा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले आहेत. एका दिवसात अदानी यांचे 46,086 कोटीचे नुकसान झालं आहे.