रस्ता ओलांडणाऱ्या लहान मुलीस दुचाकीची धडक

0
255

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – आईसोबत रस्ता ओलांडत असलेल्या लहान मुलीला भरधाव दुचाकीने धडक दिली. त्यात मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी (दि. १८) सकाळी साडेआठ वाजता शनी मंदिर, पिंपरी येथे घडला.

आरुषी अजित कांबळे असे जखमी मुलीचे नाव आहे. याप्रकरणी आरुषीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची मुलगी शनी मंदिर पिंपरी येथे रस्ता ओलांडता होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीने फिर्यादी यांच्या मुलीला जोरात धडक दिली. त्यात मुलगी गंभीर जखमी झाली. अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळी न थांबता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.