आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या समृद्ध, सशक्त आणि ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पनेला नवी गती देण्यासाठी भोसरी येथे भव्य-दिव्य वातावरणात ‘सेवा ज्योती यात्रा’ आणि ‘विकसित भारत संकल्प सभा’ अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडली. ‘२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा’ या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यात भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.नितीनजी नबीन साहेब यांचे डिजिटल माध्यमातून झालेले मार्गदर्शन. लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून झालेल्या या संवादातून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जनसेवा, राष्ट्रनिर्माण आणि विकसित भारताच्या ध्येयासाठी योगदान देण्याचा संदेश देण्यात आला.
”मोदीजींच्या नेतृत्वाखालील २५ वर्षांची जनसेवा हीच राष्ट्रसेवेची खरी प्रेरणा!”
”आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांचा सार्वजनिक सेवेतील २५ वर्षांचा प्रवास हा केवळ राजकीय प्रवास नसून, तो या देशाच्या पुनरुत्थानाचा आणि जनसेवेचा महायज्ञ आहे. ‘सेवा ज्योती यात्रे’च्या माध्यमातून पेटवलेली ही सेवेची ज्योत पिंपरी- चिंचवडच्या घराघरांत पोहोचवून ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार करण्यासाठी पिंपरी- चिंचवड शहर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध आहे. पंतप्रधान मोदीजी आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनाने आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे.”
– श्री शत्रुघ्न (बापु) काटे
शहराध्यक्ष, भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)
या राज्यस्तरीय स्वरूपाच्या महासभेला शहरातील साधारण २,५०० हून अधिक कार्यकर्ते, महिला व नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. संपूर्ण सभा परिसर ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
या प्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष श्री. केशवजी उपाध्ये साहेब, आमदार श्री. महेशदादा लांडगे, आमदार श्री. शंकरशेठ जगताप, आमदार श्री. अमितभाऊ गोरखे, आमदार सौ. उमाताई खापरे, महापौर श्री. रवीभाऊ लांडगे, सत्तारूढ पक्षनेते श्री. प्रशांतभाऊ शितोळे, उपमहापौर सौ. शर्मिलाताई बाबर, संघटन सरचिटणीस श्री. मोरेश्वरभाऊ शेडगे, सरचिटणीस श्री. विकासदादा डोळस, सरचिटणीस श्री. मधुकरभाऊ बच्चे, सरचिटणीस सौ. वैशालीताई खाड्ये, सरचिटणीस श्री. संजयभाऊ पटणी, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष श्री. सदाशिवराव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रभारी श्री. राजेश अण्णा पिल्ले, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. दिनेशभाऊ यादव, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुजाताताई पालांडे यांच्यासह शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, महिला-युवा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा’ या संकल्पनेतून जनसेवेची परंपरा अधिक व्यापक करण्याचा आणि विकसित भारताच्या ध्येयासाठी कार्यकर्त्यांनी योगदान देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

