निगडीत संत तुकाराम महाराज पालखीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत..

bpcauthor
2 Min Read

वारकऱ्यांसाठी अल्पोपहार व मोफत आरोग्यसेवा

निगडी (दि. ९ जुलै २०२६) :- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे यंदाही निगडी येथील संत तुकाराम महाराज व्यापार संकुल, शिवतेज प्रतिष्ठान निगडी आणि रमामंगल सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुष्पहार अर्पण करून उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर वारकरी बंधू-भगिनींचे स्वागत करत त्यांना अल्पोपहाराचेही वाटप करण्यात आले.

या उपक्रमात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. यावेळी सुरेश वाडकर, संतोष सौंदणकर, रवींद्र चौधरी, नंदकिशोर तोवर, प्रफुल्ल पोटफोडे, कांताराम काशीद, प्रदीप पवार, मिलिंद कुलकर्णी, गणेश उगले, सचिन घाडगे, ओमप्रसाद परदेशी, विजय शिनकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी नियोजन व सेवा कार्यात सहभाग घेतला.

याचबरोबर स्वर्गीय गजानन बाबर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर विश्वस्त संस्था आणि महाराष्ट्र होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने वारकरी बंधू-भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी या आरोग्यसेवेचा लाभ घेतला.

आरोग्य शिबिरात डॉ. आदिती वड, डॉ. रूपाली विभूते, डॉ. हर्षा मोरे, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. स्मिता जुईन, डॉ. रूपाली वाढरे, डॉ. आईशा मोमीन, डॉ. अमृत गोसावी, डॉ. पल्लवी सफाळे आणि डॉ. इंदू गुडागळे यांनी सेवा बजावत वारकऱ्यांना वैद्यकीय सल्ला व उपचार उपलब्ध करून दिले.

Share This Article