भोसरी एमआयडीसी परिसरातील लेबर कॅम्पजवळ एका अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी (२८ जून) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव सानप यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा भोसरी एमआयडीसी मधील क्रांती चौकाकडून पंतप्रधान आवास योजनेकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला संशयास्पदरित्या मिळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात ४० हजार ५०० रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत कारतूस आढळून आले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

