लोणावळ्यातील कैवल्यधाममध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा खासदार श्रीरंग बारणे यांची उपस्थिती

PCB Admin
1 Min Read

दि.२२(पीसीबी)- लोणावळ्यातील प्रसिद्ध कैवल्यधाम योग संस्थेत आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव सुबोध तिवारी यावेळी उपस्थित होते. योग शिक्षिका देवश्री गांगुली, सागर ठाकूर यांनी योगाचे धडे दिले. सूर्य नमस्कार , कंधारासन , मर्कटासन , द्वीपाद उत्तानपादासन, भुजंगासन, तिरयक भुजंगासन, शशांकासन, बधद कोनासन, ताडासन, वीरासन इत्यादी आसने तसेच कपालभाती , भाकरीचा, अनुलोम विलोभनीय , शितली शितकारी प्राणायाम करण्यात आले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, भारताने योग ही जगाला दिलेली मोठी देण आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात योग पोहोचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांच्या माध्यमातून जागतिक योग दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. माणसाने सुदृढ राहण्यासाठी योगा करण्याची गरज आहे. जगाला योगाची गरज आहे. त्यासाठी एक दिवस नव्हे तर दररोज नियमितपणे योग करणे आवश्यक आहे.

Share This Article