अमेरिकन टेक कंपनी Dell Technologies ने सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांची केली कपात

1 Min Read

दि.११(पीसीबी)-जगभरातील आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकन टेक कंपनी Dell Technologies ने सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांची कपात केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामागे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वाढता वापर आणि खर्च कमी करण्याच्या धोरणाचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जात आहे.

कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षभरात Dell ने जवळपास 10 टक्के कर्मचारी कमी केले आहेत. 31 जानेवारी 2026 पर्यंत कंपनीत 97,000 कर्मचारी कार्यरत असून, मागील वर्षी ही संख्या 1,08,000 होती. यावरून ही कपात अचानक नसून दीर्घकालीन नियोजनाचा भाग असल्याचं स्पष्ट होतं.

सध्या Artificial Intelligence आणि ऑटोमेशनचा वापर झपाट्याने वाढत आहे. अनेक पारंपरिक कामे आता मशीन आणि सॉफ्टवेअरद्वारे केली जात आहेत. त्यामुळे कंपन्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी AI वर अधिक अवलंबून राहत आहेत.

याच पार्श्वभूमीवर Dell ने “cautious hiring” म्हणजेच अत्यंत मर्यादित भरती धोरण अवलंबले आहे. यामुळे नवीन नोकऱ्यांच्या संधीही कमी होत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा ट्रेंड पुढील काही वर्षांत आणखी वेगाने वाढू शकतो.

Dell चा हा निर्णय केवळ AI मुळे नसून कंपनीच्या खर्च नियंत्रण आणि व्यवसाय पुनर्रचनेचाही भाग आहे. 2025 आर्थिक वर्षातही कंपनीने अशाच प्रकारची कपात केली होती. त्यामुळे ही रणनीती दीर्घकालीन असल्याचे संकेत मिळत आहेत.

Share This Article