रोज एका महिलेचा व्हिडीओ बाहेर, मुलांचा डिएनए चेक होतोय…

PCB Admin
3 Min Read
  • रुपाली ठोंबरे यांच्या आरोपांनी खळबळ

नाशिक, दि. २७ – “मूळामध्ये खरात ज्याच्यात आरोपी आहे. तो गुन्हा नाशिक शहरने दाखल केलेला असून तातडीने तो तपास एसआयटीकडे गेलेला आहे. झाशीची राणी प्रतिष्ठानच्यावतीने मी मागणी केलेली आहे की, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष यांना तात्काळ अटक केली पाहिजे. त्यांचा सातत्याने शिर्डी, आर्वीत खरातने इतरांवर जो गुन्हा दाखल केलेला.तो गुन्हा दाखल करण्याचा दबाव माजी राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टाकला होता” असा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला. “सातत्याने महिलांना तिथे पाठवणे एवढी भयानक गोष्ट आहे. राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडित महिलांचं समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतील ग्रह चेक करुन घ्या, असे बाबा आहेत. असं करुन ते प्रकरण वर्ग केल जात होतं. त्याच्यामुळे शहर पोलिसांनी एसआयटीकडे प्रकरण दिलं असलं तरी आम्ही सुद्धा कायदेशीर निवेदन दिलेलं आहे” असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

“रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे. पुणे शहरात जे लोक आले होते, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटले. ते प्रकरण का दाबलं गेलं? त्याच्यात किती आर्थिक देवाण-घेवाण झाली. या गोष्टी तपासात समोर येणं गरजेचं आहे” असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या. ‘हे भोंदूबाबा प्रकरण झाल्यापासून सतत पीडित महिलांचे फोन येत आहेत. त्यांची नाव समोर न येणं महत्वाचं आहे’ असं त्या म्हणाल्या. रुपाली चाकणकर हे रॅकेट चालवत होत्या का? यावर रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, ‘जे पुरावे समोर आलेत त्यानुसार रुपाली चाकणकर चालवत आहेत हे प्रथमदर्शनी दिसत आहे’ “हे प्रकरण सीपी साहेब त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही. त्यामुळे ते माहिती देऊ शकत नाहीत. पण तेजस्विनी सातपुते माहिती देऊ शकतात. रुपाली चाकणकर यांची अजूनपर्यंत का चौकशी झाली नाही?” असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला.

तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात तोडपानी केली ?
“रोज एका महिलेचा व्हिडिओ बाहेर येत आहे. चाकणकर त्यांच्या फॅमिलीचा व्हिडिओ आहे का? याची माहिती द्या. महाराष्ट्रातील महिलांची विनाकारण बदनामी केली जात आहे. महाराष्ट्रातील कुटुंब हादरली आहेत. ज्या महिलांना मूल होत नव्हतं, त्या तिथे गेल्या होत्या. आता त्यांना मूल झालय. पण त्यांचे नवरे हे भोंदू प्रकरण समोर आल्यानंतर कौटुंबिक वाद विकोपाला गेलाय. डीएनए टेस्ट केल्या जात आहेत. अनेक कुटुंब बरबाद होत आहेत” असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या. याला तो भोंदू अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष जबाबदार आहेत. तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात तोडपानी केली” असा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला.

Share This Article