दि.०९(पीसीबी)-अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाचा आज 10 वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून आता इराणच्या तेल डेपोला टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यानंतर मोठी आग पसरत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल संयुक्तपणे कारवाई करत इराणच्या प्रमुख ठिकाणांना टार्गेट करत आहे. दुसरीकडे इराणकडूनही भीषण हल्ले केले जात आहेत. या युद्धात आखाती देशही ओढले गेले. आखाती देशांवर हल्ले केले जात असून सुरक्षित वाटणाऱ्या शहरांवर हल्ले केले जात आहेत. दुबईच्या विमानतळावर अनेकदा इराणकडून घातक हल्ले झाले. अमेरिकेच्या बाजूने अनेक देश या युद्धात आहेत. थेट पणे मदत करण्याचे भाष्यही केले जात आहे. मात्र, या युद्धात इराण एकटा पडला असून एकही देश इराणच्या मदतीकरिता पुढे आला नसल्याचे दिसत आहे. इराणमधील स्थिती अधिक भयानक आहे. सध्या इराणचे तेल डेपो टार्गेटवर आहेत.
इस्त्रायल आणि अमेरिकेकडून होणाऱ्या हल्ल्यादरम्यान आता अजून मोठ्या संकटात इराण सापडला आहे. होणाऱ्या बॉम्ब हल्ल्यांचा परिणाम किती जास्त भयंकर इराणवर होत आहे, हे स्पष्ट झालंय. थेट इराणमध्ये काळा पाऊस पडला. पाण्यासोबत तेल देखील मिक्स झाल्याचे दिसले. इराणमध्ये काळा पाऊस पडल्याने मोठी खळबळ उडाली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. गेल्या आठ दिवसांपेक्षा अधिक काळापासून इराणवर घातक बॉम्ब हल्ले होत आहेत.
आता तेल डेपोला टार्गेट करून हल्ले केले जात असल्याने इराणमध्ये पर्यावरण धोक्यात आले. इराणची राजधानी तेहराममध्ये निसर्गाचे एक घातक रूप बघाला मिळाले. तेहरामध्ये चक्क तेलाचा पाऊल झाला. या युद्धाचे गंभीर आणि घातक परिणाम आता थेट पर्यावरणावरही होत आहेत. तेहरानमध्ये इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर मोठा पाऊस झाला. मात्र, तेलाचे अंश असलेले थेंब पडले. ज्यामुळे इमारती, रस्ते आणि वाहने काळे झाले











































