“पुण्याचा ‘मुली-धर’ कोण? लवकरच जनतेसमोर ‘आण्णा’ र…”

0
2

दि.०२(पीसीबी) – पुण्यातील राजकीय वातावरण सध्या एका सूचक सोशल मीडिया पोस्टमुळे चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नगरसेवक अमोल बालवडकर यांनी इन्स्टाग्रामवर एक खोचक पोस्ट शेअर केली आहे. “पुण्याचा ‘मुली-धर’ कोण? लवकरच जनतेसमोर ‘आण्णा’ र…” अशा शब्दांत त्यांनी कुणाचेही नाव न घेता निशाणा साधला आहे. या पोस्टमधील शब्दरचना पाहता बालवडकरांचा रोख नेमका कुणाकडे आहे, याबाबत आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अमोल बालवडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये वापरलेले शब्द हे अत्यंत विचारपूर्वक निवडलेले असल्याचे जाणवते. कोणाचेही नाव थेट न घेता, त्यांनी केलेल्या या विधानामुळे आगामी काळात पुण्यातील राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधान आले आहे. या पोस्टमुळे राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली असून, बालवडकर नेमका कोणता ‘पेच’ टाकत आहेत किंवा कोणता ‘गौप्यस्फोट’ करणार आहेत, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.