मध्य पूर्व आशियासमोर युद्धाचं संकट

1 Min Read

अविव: इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं हल्ला केल्यानं मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानं संपूर्ण मध्य पूर्व आशियासमोर युद्धाचं संकट आ वासून उभं आहे. इराणनं आसपासच्या देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे. लष्करासह नौदल तळांवरही इराणनं हल्ले चढवले आहेत. या सोबतच इराणनं इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं डागली आहेत. त्यामुळे युद्धाची आग संपूर्ण अरब देशांमध्ये पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीनं इराणवर हवाई हल्ले केले. यापासून आखाती देशांनी स्वत:ला अलिप्त ठेवलं होतं. आम्ही या युद्धात सहभागी होणार नाही आणि आमची जमीन युद्धासाठी वापरु देणार नाही, अशी भूमिका कतार, यूएई आणि सौदी अरेबियानं घेतली होती. पण इराणनं अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. आखाती देशांमध्ये अमेरिकेचे अनेक सैनिकी तळ आहेत. त्यावर इराणनं हल्ले केले आहेत. यानंतर आता शेजारील देशांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Share This Article