सुनेत्रा पवार यांच्याकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा

PCB Admin
1 Min Read

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठी फेरबदल करण्यात आले असून सुनेत्रा पवार यांच्याकडे आता अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एनसीपी) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची या पदावर नियुक्ती होणे निश्चित मानले जात होते.

अजित पवार यांच्या पश्चात पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता होती. प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा होती, पण त्यांनी या चर्चांना फेटाळून लावले. सर्व कायेदशीर प्रक्रिया पूर्ण करूनच निवड केली जाईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले होते. सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी सर्व नेतेमंडळी ठाम उभी राहणार असून, पक्ष बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

Share This Article