रवी लांडगे यांची महापौर पदावरही बिनविरोध निवड

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. २ – सलग दोन वेळा भाजपकडून बिनविरोध नगरसेवक पदी निवडूण आलेल्या रवी लांडगे यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर पदावरही बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, ६ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या पहिल्याच सभेत
महापौर- उपमाहापौर पदाची निवडणूक होणार असल्याने अधिकृत घोषणा होईल.

महापौर पदासाठी फक्त रवी बाबासाहेब लांडगे (भारतीय जनता पार्टी) – प्रभाग क्र. ६ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या पदासाठी उमेदवार दिला नाही.

उपमहापौर पदासाठी दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून त्यात वैशाली जालिंदर काळभोर – (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) – प्रभाग क्र. १०

शर्मिला बाबर – (भारतीय जनता पार्टी) – प्रभाग क्र. १५ यांचा समावेश आहे.

Share This Article