२८ जानेवारीला प्लेन क्रॅश होणार ! ६ महिन्यांपूर्वीची भविष्यवाणी

0
3

दि.२८(पीसीबी)उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानाचा अपघात झाल्याने पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. पण २८ जानेवारीला प्लेन क्रॅश होणार, असा इशारा एका ज्योतिषाने आधीच दिला आहे. पुणे शहरातील एका मराठी ज्योतिषाने तसेच समिताचार्य नामक भविष्यकारांचे हे भाकित खरे ठरले आहे.

जवळपास एक वर्षापूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या ज्योतिषाने २८ जानेवारीला प्लेन क्रॅश होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तसंच अनेक पॉडकास्टवरही आपल्या या भविष्यवाणीवर ते ठाम राहिले.

आता अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्या ज्योतिषाने पुन्हा आपला व्हिडीओ पोस्ट करत आपली भविष्यवाणी खरी ठरल्याचं सांगितलं. त्याने याआधी केलेल्या भविष्यवाणीचे पुरावेही दिले आहेत. तसंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आधीचे व्हिडीओही आहेत. सुमिताचार्य महाराज असं या ज्योतिषाचं नाव आहे. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरील माहितीनुसार त्यांना पद्मश्रीही मिळालेला आहे.