पाच जणांच्या टोळक्याकडून कंत्राटदाराला मारहाण

0
2

जुना वाद आणि वर्चस्वाच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला बांबूने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवारी (२४ जानेवारी) रात्री संभाजीनगर येथील साई उद्यानच्या मागील गेटसमोर घडली.

या प्रकरणी जितेन्द्र शांतीलाल छाबडा (५२, संभाजीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश माधव बिरादार (२८, महात्मा फुले नगर, चिंचवड), भूषण सूर्यकांत सोनवणे (२०, आकुर्डी, निगडी), यश संजय ठाकरे (२३, मोहननगर, चिंचवड), कृष्णा तानाजी जगताप (२६, संभाजीनगर) आणि योगेश रुद्र (२५, चऱ्होली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्राला भेटून घरी जात असताना आरोपींनी बेकायदेशीर गर्दी जमवून त्यांना अडवले. “तुला खूप माज आला आहे” असे बोलून आरोपींनी हातातील बांबूने फिर्यादीच्या पाठीवर आणि पायावर जोराने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून पोलिसांनी यातील तिघांना अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.