पिंपरी-चिंचवड पद्मशाली संघमचा महर्षी मार्कंडेय महामुनी जयंती सोहळा संपन्न

0
5

दि.२७( पीसीबी)-पिंपरी–चिंचवड पद्मशाली संघम व पिंपरी–चिंचवड पद्मशाली युवक संघम यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी मार्कंडेय महामुनी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी असूनही समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाचे यश अधोरेखित केले.

या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर व नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अपर्णाताई डोके यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली पिंपरी चिंचवड पद्मशाली संघमचे अध्यक्ष श्री. रमेश दासरी त्यांचे स्वागत केले.समाजाच्या विविध उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कै. आनंदीबाई डोके सांस्कृतिक सभागृह, चिंचवडगाव येथे पार पडलेल्या या सोहळ्यात महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. समाज संघटन, एकोपा व भावी पिढीसाठी सकारात्मक दिशा यावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, युवक कार्यकर्ते तसेच महिला भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित समाजबांधवांनी भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

हा कार्यक्रम पिंपरी–चिंचवड परिसरातील पद्मशाली समाजाच्या संघटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.