दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा अजितदादांना फायदाच

0
2

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला ४५ टक्के, तर राष्ट्रवादीला ३७ टक्के मतदान

दि.२२(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपने ८४ जागा जिंकून पूर्ण ताबा मिळवला आहे. ९,८९,०२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापैकी भाजपला ४,४७,१०१ मते मिळाली, म्हणजे ४५.२० टक्के. २०१७ मध्ये भाजपला ३७ टक्के मते मिळाली होती, तर यंदा त्यांचे मतांचे प्रमाण जवळपास ८ टक्क्यांनी वाढले आहे. शहरातील भाजपाच जनाधार विस्तारत चालल्याचे या निवडणुकितून स्पष्ट दिसले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)ला ३,६३,३६१ मते मिळाली, जे ३६.३७ टक्के आहे. २०१७ मध्ये राष्ट्रवादीला एकत्रित २८.५३ टक्के मते मिळाली होती, त्यामुळे त्यांनीही आपला जनाधार वाढवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यापासून प्रचारात आक्रमक भूमिका घेतल्याने त्याचा फटका भाजपला बसला आहे तर, राष्ट्रवादीला बऱ्यापौकी टक्का वाढला आहे.

शिवसेनेच्या पक्षफुटीचा परिणाम मतांवर स्पष्ट दिसून आला आहे. शिंदे गटाला ९१,१७६ मते (९.२१ टक्के) तर उद्धव गटाला ४१,७६८ मते (४.२३ टक्के) मिळाली. २०१७ मध्ये एकत्रित शिवसेनेला १६.५८ टक्के मते होती.
काँग्रेसला २७,८०२ मते (२.८१ टक्के) तर मनसेला १४,७६८ मते (१.४९ टक्के) मिळाली. यंदाच्या निवडणुकीत स्पष्ट झाले की भाजप आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांकडे बहुसंख्य मत केंद्रित झाले आहेत, तर इतर पक्षांचा प्रभाव मर्यादित राहिला आहे.