निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून आमदार शंकर जगताप यांच्यावर होती पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी
भाजपाचा चिंचवड 39, भोसरी 35 तर पिंपरी मतदारसंघांमध्ये 12 जागांवर विजय
पिंपरी , दि. १७ – पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये जगताप कुटुंबीयांचा करिष्मा कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 2017 मध्ये लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवडमध्ये परिवर्तन घडवले. पिंपरी चिंचवडकरांच्या स्वाभिमानावर शहरांमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आणली. तोच करिष्मा 2026 मध्ये देखील पहायला मिळाला. यंदाच्या निवडणुका निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. यामध्ये देखील भाजपने निर्विवाद सत्ता मिळवत पिंपरी चिंचवड मध्ये कमळ फुलवले.
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 पार पडली. 16 जानेवारी रोजी या निवडणुकांचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये भाजप 85, राष्ट्रवादी काँग्रेस 37, जागांवर तर शिवसेनेने 5 जागांवर विजय मिळवला. यापूर्वीच्या सर्व महापालिका निवडणुका या लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. 2023 मध्ये लक्ष्मणभाऊ जगताप यांचे निधन झाले. लक्ष्मणभाऊ जगताप यांचा या पूर्ण शहरावर ‘ होल्ड’ होता. त्यांच्या एकहाती मार्गदर्शनाखाली या शहरातल्या निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या जायच्या. तेच संघटन तोच करिष्मा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 चिंचवड मतदार संघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून त्यांच्यावर पिंपरी चिंचवडची कमान सोपवण्यात आली होती. या संधीचे सोने करत शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता खेचून आणली आहे. एकीकडे आरोपांचे रान उठवत राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केलेला असताना भाजपाने आपला यशाचा “ग्राफ” कायम राखला आहे. यामध्ये शंकर जगताप यांच्या संघटन आणि नियोजनाची चुणूक दिसून आली. चिंचवड मतदार संघातून 39 जागांवर भाजपने विजय संपादित केला. अनुक्रमे भोसरीमध्ये 35 तर पिंपरी मध्ये 12 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.
लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या निधनानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होती. यामध्ये लक्ष्मण भाऊ जगताप यांची उणीव नक्कीच आम्हाला होती. मात्र त्यांनी दिलेले विचार आणि शहराचा विकास हेच अंतिम ध्येय मानून आम्ही काम केले. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा विजय सुज्ञ मतदारांचा विजय आहे विकासाला विरोधाची झालर चढवण्याचा प्रयत्न झाला मात्र मतदारांनी तो खोडून काढला. मतदारांना शहराच्या विकासाचे महत्त्व समजलेले आहेत.












































